महाराष्ट्र दिनी जळगाव पोलिसांचा सन्मान; पोलीस नाईक अकरम शेख यांना महासंचालक पदक प्रदान.

 


जळगाव : महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी जळगाव जिल्ह्यात कार्यरत पोलीस नाईक अकरम शेख यांना दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे मा. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते त्यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले.

पोलीस नाईक अकरम शेख यांनी आपल्या सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेमुळे पोलीस दलात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

या सन्मानामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढला असून, सहकारी अधिकारी व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती मानला जात आहे.