जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक श्री सूरज पाटील हे मुंबई पोलीस दलात भरती होऊन सन 2007 मध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलात बदलीने दाखल झाले. गेल्या सुमारे 20 वर्षांपासून त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन, एल.सी.बी. जळगाव तसेच डीवायएसपी कार्यालय भुसावळ येथे प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे.
आपल्या सेवाकाळात त्यांनी दरोडे, घरफोडी, जबरी चोरी, चोरी, खून तसेच फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून अनेक गुन्हे उघडकीस आणले. तसेच गोपनीय माहितीचे प्रभावी जाळे तयार करून संभाव्य गुन्हे रोखण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांना पोलीस महासंचालक (D.G.) पदकाने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान गुलाबराव पाटील (कॅबिनेट मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री) तसेच श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
या यशाबद्दल श्री सूरज पाटील यांचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Social Plugin