जळगाव : विशेष सरसोल पुनर्निरीक्षण (SIR) अंतर्गत मतदार नाव नोंदणी कॅम्पचे आयोजन

 



जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सरसोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत मतदार नोंदणी व पडताळणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प सोमवार दि. 27 एप्रिल 2026 व मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सरस्वती विद्यालय, शिव कॉलनी, अथर्व कॉलनी आरएमएस कॉलनी विद्युत कॉलनी मारुती पार्क परिसर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दिपमाला मनोज काळे, नगरसेविका सौ. अंकिता पंकज पाटील, तसेच नगरसेवक विशाल सुरेश भोळे आणि नगरसेवक चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांनी केले आहे.

 अभियानाचे उद्दिष्ट

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मिशनमध्ये 2002 च्या मतदार यादीच्या आधारे 2025 च्या मतदार यादीतील नावे मॅपिंग करण्यात येत आहे. यामध्ये: कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकत्र करणे

बोगस व अवैध नावे वगळणे

मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक बनवणे

 नागरिकांसाठी सूचना

शिव कॉलनी, विद्युत कॉलोनी, कौल्हे नगर, मारुती पार्क या परिसरातील नागरिकांनी या कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपली व कुटुंबीयांची मतदार माहिती तपासून घ्यावी. अनेक वेळा मतदार नावे तपासत नसल्यामुळे मतदानाच्या दिवशी अडचणी निर्माण होतात. 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अशा समस्या टाळण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

 BLO अधिकारी व पर्यवेक्षक

भाग क्रमांक 173 ते 180 साठी खालील BLO अधिकारी उपस्थित राहणार आहेत:

173 – यादव सर

174 – ढोले सर

175 – महाले सर

176 – भारत पाटील सर

177 – रोकडे सर

178 – लोकरे सर

179 – किशोर पाटील सर

180 – संजय पाटील सर


 पर्यवेक्षक : इमरान खटीक सर


 ज्यांचे मॅपिंग आधीच पूर्ण झाले आहे, त्यांनी येण्याची आवश्यकता नाही.


सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.