अक्कलकुवा | प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि तब्बल ८ जणांना चावा घेऊन जखमी करणाऱ्या माकडाला अखेर वनविभागाने यशस्वीरित्या जेरबंद केले. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ही मोहीम अक्कलकुवाचे आर.एफ.ओ. पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. वनपाल ममता पाटील व वनविभागाच्या पथकासह नंदुरबारचे मानद वन्यजीव रक्षक संजय वानखेडे आणि 'वन्यप्राणी संरक्षण व बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार'चे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष वसिम मक्राणी, राहुल कढरे, समाधान सोनवणे, कैलास देसाई, अमण मक्राणी, वाल्मिक कोळी आणि विशाल क्षत्रिय यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या या माकडाला शिताफीने पकडण्यात वनविभागाला यश आले. या धाडसी कारवाईबद्दल वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांच्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Social Plugin