गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 




जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी (२०२५-२६) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाच्या एकूण गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये एआय अँड डेटा सायन्स शाखेचा चेतन दिनेश चौधरी याने ९.६१ सीजीपीए गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. अंकिता संजय घाटे (इलेक्ट्रिकल) हिने ९.३२ सीजीपीए गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर गौरव रामा इंगळे, अल्फिया नाज शोएब खातीक आणि युक्ता भानुदास तळेले यांनी प्रत्येकी ९.३० सीजीपीए गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला.

शाखानिहाय निकालात इलेक्ट्रिकल शाखेत अंकिता संजय घाटे प्रथम, युक्ता भानुदास तळेले द्वितीय आणि राजश्री अनिल यादव तृतीय ठरल्या. ई अँड टीसी शाखेत मैती अंतरा संजय प्रथम, भूमिका लक्ष्मण भंगाळे व अचल सत्यजित नर्खेडे संयुक्त द्वितीय, तर जान्हवी उमाकांत बारजीभे तृतीय ठरली. मेकॅनिकल शाखेत श्वेजल संजय परासे प्रथम, जान्हवी लक्ष्मीकांत राजपूत द्वितीय आणि संकेत दिलीप बागड तृतीय क्रमांकावर राहिले. एआय अँड डेटा सायन्स शाखेत चेतन दिनेश चौधरी प्रथम, खुशबू धनराज नाले द्वितीय आणि भैरवी मनीष कुरकुरे तृतीय ठरल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयात उपलब्ध आधुनिक शिक्षणसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करत असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडल्याचा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.