चोपडा पोक्सो प्रकरणाचा निकाल; आरोपीला शिक्षा. चोपडा पोलिसांच्या तपासाला यश.

 


चोपडा | प्रतिनिधी

चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो व अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात चोपडा शहर पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे आरोपीला शिक्षा झाली.

दि. २५ जून २०२६ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश क्र. १, अमळनेर यांनी स्पेशल केस क्र. ५०/२०२४ मध्ये आरोपी सलमान खान अख्तर खान (वय २८, रा. हमीद नगर, चोपडा) यास ५ वर्षे सक्तमजुरी, ₹५,५०० दंड व दंड न भरल्यास ६ महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

न्यायालयीन सुनावणीत आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. घोलप व श्री. सोनावणे यांनी तपास पूर्ण केला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता श्री. के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

जळगाव जिल्हा पोलीस अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, या निकालामुळे अशा गुन्हेगारांना कठोर संदेश गेला आहे.