स्व. सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

 



जळगाव | प्रतिनिधी : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक व सर्वोच्च नेते स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १२ जुलै २०२६) जळगाव येथे भव्य सामाजिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शिरसोली रोडवरील सुदर्शन पॅलेस येथे पार पडणार असून, राजपूत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश मिळविणारे विद्यार्थी, उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे समाजसेवक, जिल्ह्यातील नगरपरिषद व महानगरपालिकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी, समाजहितासाठी योगदान देणारे उद्योजक, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त समाजबांधव, शासकीय सेवेत पदोन्नती मिळालेले तसेच विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने निवड झालेल्या समाजबांधवांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

याशिवाय समाजाच्या विविध क्षेत्रांत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना "राजपूत समाज भूषण पुरस्कार" प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी राजस्थान येथून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कटियार यांच्यासह करणी सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी राजपूत समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.