महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात अन्नदान व फळवाटप

 


जळगाव (प्रतिनिधी) : महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, महानगरतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांसाठी अन्नदान व फळवाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात रुग्णांना पौष्टिक फळे व भोजनाचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती कर्तव्याची भावना जपत रुग्णांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, नगरसेवक निलेश तायडे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोज काळे, जिल्हा चिटणीस मिलिंद चौधरी, आनंद सपकाळे, आरोग्यदूत शिवाजी पाटील, पितांबर भावसार, हर्षल सिखवाल, सुशील जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.