महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये वृक्षारोपण व रक्तदान शिबिर

 


जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मंडळ क्रमांक २ तर्फे प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

डेमला कॉलनी येथील साईबाबा मंदिरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात नागरिक, युवक आणि भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्ताचा तुटवडा भासू नये, या सामाजिक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गजानन कॉलनी व नंदनवन कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लावलेल्या वृक्षांचे संगोपन व जतन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.

या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, नगरसेविका अंकिता पंकज पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माधुरी अत्तरदे, माजी नगरसेवक मनोज काळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हाचिटणीस मिलिंद चौधरी, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, पंकज पाटील, तसेच रेखा वर्मा, दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, राजनंदिनी राणा, सुमित्रा पाटील, केदार देशपांडे, आजू पटेल, अरुण भोळे, सुनील कासट, मनोहर बारी, सनी पटेल, रुपेश राणे, ऋषिकेश शिंपी, अविनाश भोळे, तुळशीराम नेमाडे, सुभाष ठाकूर, रोहित वाघ, धीरज वर्मा, भूषण पाटील, सुनील पाटील, महेंद्र मुंदडा, सुधाकर पाटील, नरेंद्र चौधरी, रमेश महाले, ज्ञानदेव नारखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.