पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महिनाभरात सुधारित अहवाल सादर करा – मंत्री अनिल पाटील

 



मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महिनाभरात सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. मावळ तालुक्यातील पवना, आंद्रा, जाधववाडी,भूशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बुधवारी (दि.23) बैठक झाली.



याबैठकीत मंत्री अनिल पाटील यांनी पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेतला. पुनर्वसनाबाबत जलसंपदा व महसूल विभागाने केलेल्या जमिन वाटप अहवालात त्रुटी असल्याने यासंदर्भात दोन्ही विभागाचे संबंधित अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन वाटप क्षेत्र निश्चित करावे.आणि महिन्याभरात सर्व तांत्रिक त्रुटी दूर करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.