रिल्स बादशहा तासाभरात वठणीवर

 


पुणे प्रतिनिधी.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नको ते व्हिडिओ व्हायरल करून प्रसिद्ध होण्याचे  फॅड हल्ली वाढले आहे. पुण्यात यापूर्वी थेरगाव क्वीन नावाने असलेली व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर असाच काहीसा प्रकार आता हडपसर परिसरातून उघडकीस आला आहे. रिल्स तयार करून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या.




पवन संतोष भारती (वय 20, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.