समाजवादी विचारसरणीचे नेते, अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. आज (बुधवार) दुपारी दोन वाजता त्यांच्या मुळगावी दहिवद (ता.अमळनेर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
समाजवादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत अहिराणी भाषेतून शपथ घेणारे ते पहिले आमदार होते. खानदेशाची मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख होती.
धुळे जिल्हा परिषदेतील भास्कर वाघ गैरव्यवहार प्रकरण, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले होते. मंत्रालयावर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे ते आजोबा होत.


Social Plugin