आमच्या कंपनीत रक्कम गुंतवणूक करा तुम्हाला तीन पट रक्कम परत मिळेल असे सांगून पाचोऱ्याच्या एका व्यावसायकाची १ कोटी ९२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा येथील व्यावसायिक नरेश पाटील यांना Wyz th कंपनीचे खगेन्द्र पांडा ,रुपेश पाटील बिपिंनसिंग,रमेशकुमार दुबे यांनी wyz th ही कंपनी सरकार मान्य असून सदर कंपनीचे अनुरागर गर्ग (AG) हे संचालक आहे. आपली कंपनी ही डिजिटल करन्सीची कामे तसेच व्यापार,बिझिनेस करते आपण आमच्या कंपनीत रक्कम गुंतवणूक केल्यास कुठलीही फसवणूक नहोता आपणास तीन पट रक्कम परतावा मिळेल व कमीत -कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे असे खोटे आमिष दिले नरेश पाटील यांनी विश्वास ठेवून या कंपनीत १ कोटी ९२ लाखाची गुंतवणूक केली. काही दिवस गेल्यानंतर नरेश पाटील यांनी गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळावा म्हणून फोनवरून संपर्क साधला असता सदर इसमांनी उडवा उडविची उत्तरे देत आपण आमच्याकडे वारंवार पैशाचा तगादा लावू नका अन्यथा आपणावर गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. त्या नंतर नरेश पाटील यांनी या कंपनी बाबत इतर ठिकाणी चौकशी केली असता या कंपनीने तीन पट पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती नरेश पाटील यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नरे पाटील यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार अर्ज सादर केला असल्याचे समजते. दरम्यान पोलीस चौफेर न्यूज च्या प्रतिनिधीने नरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाटील यांनी लवकरच या कंपनीने फसवणूक केलेल्या लोकांशी संपर्क साधून त्यांना सोबत घेऊन कायदेशीर लढा देऊ असे सांगितले आहे.

Social Plugin