पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केला सत्कार.
दी. ०४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान हरियाणा येथील मधुबन येथे झालेल्या ७२ व्या ऑल इंडिया रेसलिंग पोलीस क्लस्टर गेम २०२३ यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाकडून वजन गट 55 यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस प्रशिक्षक जागृती काळे महाजन यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत, बॉडी बिल्डिंग या खेळ प्रकारात पूर्ण भारतभरामधून कास्यपदक पटकावत जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नावलौकिक केले. व महिला बॉडी बिल्डिंग या महाराष्ट्र पोलीस संघाची चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. त्यांच्या या यश्याबद्दल पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस उप अधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड यांनी कौतुक करीत, सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काळे यांना त्यांचे सहकारी संपूर्ण वेल्फेअर विभाग यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे प्रशिक्षक पो.हे.कॉ. धनराज गुळवे (पोलीस जिम प्रशिक्षक) यांचे मोलाचें मार्गदर्शन लाभले.



Social Plugin